Wednesday, April 16, 2025

न्यूज व्हॅल्यू ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

न्यूज व्हॅल्यू

न्यूज चॅनलवरही खेळू लागले प्राणी,
डिस्कवरी व ॲनिमल प्लॅनेटचे नाव आहे
आजकाल सर्वच मिडिया मध्ये,
कुत्र्या मांजरांनाही चांगलाच वाव आहे.

याचा अर्थ मात्र असा नाही की,
यात प्राणीमात्रांचे काही पुण्य आहे.
टीआरपीच्या वाढत्या भुकेला,
सर्वच राजकीय नेत्यांचे सौजन्य आहे.

प्राणीमात्रांवरती सर्वांनी प्रेम करावे,
आमच्या मनामध्ये मात्र एक शल्य आहे!
सामान्य माणसांच्या नरक यातनांना,
पाहिजे तेवढे कुठे बातमी मूल्य आहे ?

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8889
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
16 एप्रिल2025
 

No comments:

चॅनल आणि वॉर ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- चॅनल आणि वॉर इकडे टाकले बॉम्ब, तिकडे क्षेपणास्त्र सुटू लागले आहेत. न्यूज चॅनलवच्या पडद्यावरती, युद्धाचे ढ...