आजची वात्रटिका
-------------------
पॉलिटिक्स लाईव्ह
विरोधकांबरोबर नाही तर,
मित्रा विरोधात द्रोह केले जातात.
फक्त विरोधकांनाच नाही तर,
मित्रांनाही शह काटशह दिले जातात.
शह आणि काटशहाचे राजकारण,
सर्वांच्या पाचवीलाच पुजलेले आहे.
ज्यांना त्यांना माहिती असते
कुणी कुणाला पाणी पाजलेले आहे?
शहाबरोबर काटशहाचेही,
सर्वांनाच राजकीय शिक्षण असते !
राजकारणाच्या जिवंतपणाचे,
हेच तर खरेखुरे लक्षण असते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8882
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
9 एप्रिल2025
No comments:
Post a Comment