आजची वात्रटिका
-------------------
सेन्सॉरची मूळव्याधी
अवास्तव आणि कपोलकल्पित,
अगदी अलगद सटकले जाते.
एखादे ऐतिहासिक वास्तव मात्र,
सेन्सॉरच्या कात्रीत अटकले जाते.
अनागोंदी आणि हुकूमशाहीची,
सेन्सॉर बोर्डालाही खात्री असते.
एरव्ही मुर्दाड आणि बोथट,
नको तेव्हा धारधार कात्री असते.
वास्तवाने उठते पोटशुळ,
जागृत जुनेच पाईल्स आहे !
बिनधास्त केरळा स्टोरी,
बिनधास्त काश्मीर फाईल्स आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8884
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
11 एप्रिल2025
No comments:
Post a Comment