आजची वात्रटिका
-------------------
पहिलीपासून हिंदी
कुणी म्हणतो गोष्ट युक्तीची आहे,
कुणी म्हणतो गोष्ट भक्तीची आहे.
एवढे मात्र आता नक्की झाले,
पहिलीपासून हिंदी सक्तीची आहे.
त्रिभाषा सक्तीच्या धोरणाचे,
पुरावे मात्र अवती भवती आहेत.
ज्या भाषा भगिनी वाटायच्या,
वाटू लागल्या सवती सवती आहेत.
सीबीएसई पॅटर्नच्या जयघोष करीत,
जरी हा निर्णय घेतलेला आहे !
हिंदी टीव्ही चॅनलच्या सौजन्याने,
हिंदीने सर्वत्र धुमाकूळ घातलेला आहे !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8891
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
18 एप्रिल2025

No comments:
Post a Comment