Saturday, April 12, 2025

निमताळेपणा ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

निमताळेपणा

नको त्या गोष्टी;नको तशा,
जाती धर्मावरती नेल्या आहेत.
जातीय आणि धार्मिक भावना,
नको तेवढ्या कोमल झाल्या आहेत.

हे काही आपोआप घडत नाही,
कुणीतरी जाणीवपूर्वक करतो आहे.
वाद कोणताही असला तरी,
तो जाती-धर्माभोवती फिरतो आहे.

ही काही भावनिक कोमलता नाही,
हा तर चक्क निमताळेपणा आहे !
त्यांचा नेहमीचाच मापदंड असतो,
इथे खरे बोलण्यास मना आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8885
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
12 एप्रिल2025
 

No comments:

पहिलीपासून हिंदी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- पहिलीपासून हिंदी कुणी म्हणतो गोष्ट युक्तीची आहे, कुणी म्हणतो गोष्ट भक्तीची आहे. एवढे मात्र आता नक्की झाले...