आजची वात्रटिका
-------------------
मुद्द्यांचा ताप
जेव्हा आणि जसे पाहिजेत,
तसे मुद्दे तापवले जातात.
तापलेल्या मुद्द्यांवरती,
आपले इरादे वाफवले जातात.
तापवलेल्या गेलेल्या मुद्द्यांना,
नेहमीच काळाचा शाप असतो.
विरोधकांनी तापवलेल्या मुद्द्याचा,
इतरांना मात्र नक्की ताप असतो.
आपले इरादे वाफवण्यासाठी,
मतदार राजाही वाफवावा लागतो !
एकाने एक मुद्दा तापवला की,
दुसऱ्यालाही तोच तापवावा लागतो!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8883
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
10 एप्रिल2025
No comments:
Post a Comment