Thursday, April 24, 2025

दहशतवादाचे मूळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

दहशतवादाचे मूळ

जसे मारणारांनी मारले आहेत,
तसे मरणारेही हकनाक मेले आहेत
दहशतवादाचे वेगवेगळे चेहरे,
नेहमीच जगासमोर आले आहेत.

कर्त्या आणि करवित्यांमुळेच,
दहशतवाद्यांची कसाब करणी आहे.
सत्तेच्या राजकारणाचीच,
ही सगळी विषारी पेरणी आहे.

कुणाला गल्लीत;कुणाला दिल्लीत,
कुणाला जगावर राज्य करायचे आहे !
अराजकता आणि अशांततेसाठी,
शांततेला पुन्हा पुन्हा मारायचे आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8897
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
24 एप्रिल2025
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...