Friday, April 25, 2025

राजकीय स्पर्धा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

राजकीय स्पर्धा

दुःख आणि गांभीर्याचा,
राजकारणापुढे खुर्दा आहे.
मदतीचे श्रेय लाटण्याची,
जणू राजकीय स्पर्धा आहे.

उठता बसता दिसली जाते,
ती राजकीय खोड आहे.
कर्तव्य आणि माणुसकीला,
राजकारणाची जोड आहे.

परस्परांचे छुपे स्वार्थ,
परस्परांकडून बाहेर आहेत !
हे फक्त निरीक्षण आहे,
त्यांचेच त्यांना आहेर आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8898
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
25 एप्रिल2025
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...