आजची वात्रटिका
-------------------
नाराजी नाट्य
त्यांनाही म्हणे कशाचीच खंत नाही,
यांनाही म्हणे कशाचीच खंत नाही
तरीही राजकीय नाराजी नाट्याला,
अजून तरी कसलाच अंत नाही.
एकाची इच्छा अपुरी असतानाच,
दुसऱ्याचीही इच्छा भंगलेली असते.
एकाची नाराजी मिटेपर्यंत,
दुसऱ्याचीही नाराजी रंगलेली असते.
ज्याच्या त्याच्या नाराजी नाट्याचा,
अगदी वेग वेगळा असा रंग आहे !
कुणीही मान्य करायला तयार नाही,
हा सगळा असंगाशी संग आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8888
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
15 एप्रिल2025
No comments:
Post a Comment