Monday, April 21, 2025
अन्यायाचा अर्थ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका-------------------
अन्यायाचा अर्थ
बंडखोर कोणत्याही पक्षातले असोत,
सर्वांचा सारखाच सांगावा असतो.
आपल्यावरती अन्याय झाल्याचा,
सर्वच बंडखोरांचा कांगावा असतो.
न्याय कोणता ?अन्याय कोणता?
आपण स्वतःच ठरवून मोकळे होतात.
आपला बंडखोरीचा कंडही,
आपण स्वतःच पुरवून मोकळे होतात.
अन्याय वगैर वगैरे काहीच नाही,
ज्याला त्याला नडलेला स्वार्थ असतो !
बंडाला सहानुभूती मिळावी,
हाच त्यांच्या अन्यायाचा अर्थ असतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8894
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
21 एप्रिल2025
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
आजची वात्रटिका ---------------------- गेट-टुगेदर भूतकाळातले मित्र -मैत्रिणी, खूप वर्षानंतर भेटू लागले. उजळून येतात आठवणी, छोटे झाल्यासारखे व...

No comments:
Post a Comment