Sunday, April 27, 2025

सब आलबेल है...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

सब आलबेल है...

जे टिकाऊ नाही पण विकाऊ आहे,
त्याचाच आजकाल इथे सेल आहे.
जो तो फक्त आपल्या पुरते बघतो,
बाकी मात्र सगळे आलबेल आहे

चोर सोडून संन्याशाला,
अगदी नित्यनेमाने जेल आहे.
अन्याय अत्याचाराचे सोडून द्या,
बाकी मात्र सगळे आलबेल आहे.

कट कारस्थान आणि षडयंत्रापुढे,
न्याय,नीती,सदाचार फेल आहे !
कुणाचाच कुणाला धाक उरला नाही,
बाकी मात्र सगळे आलबेल आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8900
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
27एप्रिल2025
 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...