Thursday, April 17, 2025

सैनिकहो तुमच्यासाठी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

सैनिकहो तुमच्यासाठी...

तिघांनाही मराठीची कळकळ,
तिघांचाही मराठी बाणा आहे.
पहिल्या सेनेच्या विरोधात,
दुसरी आणि तिसरी सेना आहे.

दुसऱ्या तिसऱ्या सेनेला मात्र,
भाजपाचा चांगलाच लळा आहे.
दुसऱ्या आणि तिसऱ्या सेनेचे,
तुझ्या गळा माझ्या गळा आहे.

मुंबई मनपा निवडणुकीसाठी,
तिघांची सगळी खटपट आहे !
त्यांचे त्यांनाच माहिती आहे,
कुणाचा कोणता शॉर्टकट आहे ?

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8890
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
17 एप्रिल2025
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...