Tuesday, April 29, 2025

पहलगाम का पैगाम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

पहलगाम का पैगाम

दहशतवाद्यांच्या तालावरती,
राजकीय नेते नाचू लागले.
आपापल्या अकलेचे पाढे,
एकमेकांसमोर वाचू लागले.

स्वतःला देशप्रेमी ठरवून,
इतरांना देशद्रोही ठरवू लागले.
भुकेल्या मीडियाला,
रोज नवे खाद्य पुरवू लागले.

पुन्हा राजकीय खडबड नको,
पुन्हा राजकीय गडबड नको !
ऐक्य आणि सुरक्षिततेसाठी,
नवी वायफळ बडबड नको !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8902
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
29एप्रिल2025
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...