Wednesday, April 23, 2025

बहुमताचा ओव्हर डोस ,,,प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

बहुमताचा ओव्हर डोस

कुणालाच जेवढी अपेक्षा नव्हती,
त्यापेक्षा जास्त बहुमत आज आहे.
कुणाला बहुमताचा राक्षसी आनंद,
कुणाला बहुमताचा माज आहे.

बहुमतामुळे सुरक्षित वाटायचे तर,
उलट असुरक्षित वाटायला लागले.
राहायचे तर रहा.....जायचे तर जा..
असे फर्मान सुटायला लागले.

काहींना सूचेना... काही पचेना...
असा बहुमताचा ओव्हर डोस आहे !
मतदारांनासुद्धा वाटू लागले,
यात आपलाच तर खरा दोष आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8896
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
23 एप्रिल2025
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...