Wednesday, April 30, 2025

हेडलेस ?...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

हेडलेस ?

हात दाखवून अवलक्षण,
एवढेच काय ते शेष आहे.
त्यांना जे 56 इंची वाटते,
हे म्हणतात,हेडलेस आहे.

कुणी म्हणाले वस्तुस्थिती,
कुणाच्या मते जोक आहे.
हेडलेसचा मराठी अर्थ तर,
चक्क बिनडोक आहे.

कोण हेडलेस? कोण बिनडोक?
जो जसे बघायचे तसे बघत आहे !
काँग्रेसच्या बिनडोकपणाचे मात्र,
पाकिस्तानात जंगी स्वागत आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8903
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
30एप्रिल2025
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...