Monday, April 28, 2025

चॅनल आणि वॉर ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

चॅनल आणि वॉर

इकडे टाकले बॉम्ब,
तिकडे क्षेपणास्त्र सुटू लागले आहेत.
न्यूज चॅनलवच्या पडद्यावरती,
युद्धाचे ढग दाटू लागले आहेत.

कुणाकुणाला नावे ठेवावीत?
सगळ्यांचा एकच गोतावळा आहे.
भारत आणि पाकिस्तान युद्धासाठी,
जणू सगळा मीडिया उतावळा आहे.

हवे तिथले पाणी बंद करून,
नको तिथे पाणी सोडता येऊ शकते !
रक्ताचा थेंब न सांडताही,
पाकिस्तानची खोड मोडता येऊ शकते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8901
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
28एप्रिल2025
 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...