Sunday, April 20, 2025

राजकीय ऐक्य ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

राजकीय ऐक्य

भाऊ भाऊ: काका- पुतण्या,
यांची म्हणे राजकीय एकी आहे.
घराणेशाहीतच लोकशाहीचे हित,
अशीच सर्वांची शेखी त्याची आहे

त्यांच्या घरगुती ऐक्याला,
राजकीय ऐक्याचे नाव आहे.
लोकशाहीच्या माध्यमातून साधलेला,
घराणेशाहीचा डाव आहे.

घराणेशाहीपुढे लोकशाहीचे,
सगळ्यांनीच सत्व गमावले आहे !
घराणेशाहीच्या एकीमध्येच,
सगळ्यांचे सौख्य सामावले आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8893
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
20 एप्रिल2025
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...