आजची वात्रटिका
-------------------
जयंत्यांची महास्पर्धा
उत्साह आणि जल्लोष बघून,
जयंती जयंती वरती भुलली आहे
जणू काही आजकाल जयंत्यांची,
सगळीकडे महास्पर्धाच चालली आहे.
जयंत्यांच्या अघोषित स्पर्धेत,
जो तो एकमेकांचा कित्ता गिरवतो आहे.
जल्लोष,उत्साह आणि उन्मादात,
महापुरुषांचा विचार मात्र हरवतो आहे.
लोक जसे उत्साहाने नाचले पाहिजेत,
तसे महापुरुषसुद्धा वाचले पाहिजेत !
जिथे कुठे महापुरुष पोचले नाहीत,
तिथे तिथे महापुरुष पोचले पाहिजेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8886
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
13 एप्रिल2025
No comments:
Post a Comment