Friday, June 30, 2023

एका शपथविधीचे अर्धसत्य....

आजची वात्रटिका
-------------------------

एका शपथविधीचे अर्धसत्य

प्रत्येक वेळी प्रत्येकाचा दावा,
आमचे सत्य आहे,आमचे तथ्यआहे.
खरी वस्तुस्थिती अशी दिसते की,
सांगणाऱ्या प्रत्येकाचे अर्धसत्य आहे.

पहाटेच्या शपथविधीचा गौप्यस्फोट,
दरवेळी वेगळा आणि नवा आहे.
आपली गुगली;आपलीच विकेट,
दरवेळी प्रत्येकाचा हाच दावा आहे.

प्रत्येकाचा सत्यतेचा दावा तरी,
गौप्यस्फोटात कुठे एकवाक्यताआहे?
राजकीय आत्मचरित्रं खोटी असतात,
लोकांच्या गैरसमजाचीच शक्यता आहे !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6850
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
30जून2023
-----------------------

दैनिक वात्रटिका30जून2023वर्ष तिसरेअंक -26वा


दैनिक वात्रटिका
30जून2023
वर्ष तिसरे
अंक -26वा
अंक डाऊनलोड लिंक-

Thursday, June 29, 2023

त्यागी आणि भोगी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

त्यागी आणि भोगी

सारेच झाले संधीसाधू,
सारेच एकजात स्वार्थी आहेत.
सगळ्यांचाच आव असा की,
जणू सगळेच त्यागमूर्ती आहेत.

त्यांच्या त्यागातच भोग आहेत,
हा काही निव्वळ योगायोग नाही!
कितीही शोध शोध शोधले तरी,
कुणीही इथे शहाजोग नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------
फेरफटका-8290
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
29जून2023
 

दैनिक वात्रटिका28जून2023वर्ष तिसरेअंक -24वा


दैनिक वात्रटिका
28जून2023
वर्ष तिसरे
अंक -24वा
अंक डाऊनलोड लिंक-

नजरबंदी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

नजरबंदी

आजकाल कोणत्याही गोष्टीला,
जाती- धर्माचा चष्मा लावला जातो.
त्यातून जे काही दिसते त्यावरच,
आंधळेपणाने विश्वास ठेवला जातो.

असते वेगळे;दिसते वेगळे,
ही तर त्या चष्म्याची जादू असते.
त्याला तर ते पटकन दिसते,
ज्याची ज्याची नजरच अधू असते.

ज्यांची नजरच कमी असते,
नेमके तेच आंधळे शोधले जातात!
जाती-धर्माच्या चष्म्याने,
जास्तीत जास्त तेच बाधले जातात !!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------
चिमटा-6848
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
29जून2023
 

Wednesday, June 28, 2023

मजेदार ऑफर....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

मजेदार ऑफर

आयत्या राजकीय संधीचा,
बीसीआरएस कडून वापर आहे.
हे मात्र अजून कोड्यात आहे,
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची
नेमकी कुणाकुणाला ऑफर आहे?

कुणी ऑफर दिली होती,
कुणी नव्याने ऑफर देऊ लागले.
आपल्याला ऑफर दिल्याचे,
हळूहळू गौप्यस्फोट होवू लागले.

मुख्यमंत्रीपदाच्या ऑफरची,
खरोखरच राजकीय मौज आहे !
बघा आपल्याकडे केवढी मोठी,
भावी मुख्यमंत्र्यांची फौज आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-8288
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
28जून2023
 

भ्रष्टाचाराच्या आरोपांचे पाढे...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

भ्रष्टाचाराच्या आरोपांचे पाढे

अगदी जाहीरपणे वाचले जाणारे,
एकमेकांच्या आरोपांचे पाढे आहेत.
सगळेच्या सगळे समजून चुकलेत,
आपले मतदार राजेच वेडे आहेत.

आपला लहान;त्यांचा मोठा आहे,
असे त्यांचे भ्रष्टाचाराचे पाढे आहेत.
आपल्या सोडून इतरांच्या भ्रष्टाचाराचे,
प्रत्येकाचे अभ्याससुद्धा गाढे आहेत.

भ्रष्टाचाराच्या तथाकथित आरोपांनी,
मीडियावरती इज्जत टांगली आहे !
ना खाऊंगा;ना खाने दूंगा,
घोषणा आचारायला चांगली आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------
चिमटा-6848
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
28जून2023
 

Tuesday, June 27, 2023

दैनिक वात्रटिका 27जून2023 वर्ष तिसरे अंक -23वा


दैनिक वात्रटिका
27जून2023
वर्ष तिसरे
अंक -23वा
अंक डाऊनलोड लिंक-
https://drive.google.com/file/d/1yFAgo8lEGkSFONRUYxserFC-IBBwPz2U/view?usp=drivesdk
 

बालविवाह थाट..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

बालविवाह थाट

थोरामोठ्यांच्या लग्नासारखा,
बालविवाहांचा थाटमाट आहे.
टिळा-कुंकू आणि साखरपुडा,
ही बालविवाहांची पळवाट आहे.

कायद्यासोबत वाटा पळवाटा,
जाहीर लपाछपी खेळत आहेत!
कायद्याला बोटावर खेळविणारे,
देवळा देवळात मिळत आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8287
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
27जून2023
 

वादग्रस्त वक्तव्यांची साथ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

वादग्रस्त वक्तव्यांची साथ

यांच्या हातावर त्यांचा हात,
त्यांच्या हातावर यांचा हात आहे.
बेताल आणि वादग्रस्त वक्तव्यांची,
अत्यंत घातक अशी साथ आहे.

कुणाच्या नजरेत किडे आहेत,
कुणाच्या मेंदूत किडे आहेत.
ज्यांच्या नको नको तिथे किडे,
ते तर सर्वांपेक्षाही पुढे आहेत.

उठता बसता किडे न सोडण्याचा,
किमान नियम पाळता येऊ शकतो !
उचला जीभ;लावा टाळ्याला,
हा कार्यक्रम टाळता येऊ शकतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------
चिमटा-6847
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
27जून2023
 

Monday, June 26, 2023

दैनिक वात्रटिका26जून2023वर्ष तिसरेअंक -22वा


दैनिक वात्रटिका
26जून2023
वर्ष तिसरे
अंक -22वा
अंक डाऊनलोड लिंक-

खरे क्रूरकर्मा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------


खरे क्रूरकर्मा

कुणी लावला विरोधाचा सूर,
कुणी जय जयकार लावला आहे.
समर्थकांबरोबर विरोधकांनीही,
औरंगजेब जेब मध्ये ठेवला आहे.

औरंगजेब जसा कुणाचा हिरो,
तसा कुणासाठी तो व्हीलन आहे.
भडकवलेल्या धार्मिक आगीत,
इथल्या मानवतेचे ज्वलन आहे.

इतरांच्या धर्माचा दुसरा करणे,
हेच यामागचे खरे क्रूर मर्म आहे !
औरंगजेबापेक्षाही जास्त वाटावे,
असेच आजचे हे क्रूर कर्म आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------------
फेरफटका-8287
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
25जून2023
 

अनोखी ऑफर....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

अनोखी ऑफर

एखाद्याच्या राजकीय घुसमटीचा,
बघा किती चतुराईने वापर आहे.
अजून कशातच काही नाही तरी,
थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर आहे.

ज्यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर,
तो हुकूमाचा राजकीय मोहरा आहे.
लोकांच्या मनातल्या मुख्यमंत्र्याला,
निवडणुकीतला पक्षीय चेहरा आहे.

हे अजिबातच मोजत बसू नका,
भावी मुख्यमंत्र्यांची संख्या किती आहे?
जनातल्यांची आणि मनातल्यांची,
बी.आर.एस.कडून अनोखी युती आहे !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
चिमटा-6846
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
26जून2023
 

Sunday, June 25, 2023

दैनिक वात्रटिका25जून2023वर्ष तिसरेअंक -21वाअंक डाऊनलोड लिंक

दैनिक वात्रटिका
25जून2023
वर्ष तिसरे
अंक -21वा
अंक डाऊनलोड लिंक-

पावसाळी अपेक्षा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

पावसाळी अपेक्षा

मान्सूनच्या दगाबाजीचे प्रकरण,
आता तर सारखं सारखं आहे.
दुष्काळाची वर्दी देत देत,
मान्सूनचा यंदाही लेटमार्क आहे.

मान्सून लेट आला;थेट आला,
तरीही धोक्याची घंटी आहे.
बळीराजाची कसोटी बघत,
मान्सूनचाही ट्वेंटी-ट्वेंटी आहे.

जसा लेट नको;तसा थेट नको,
ट्वेंटी-ट्वेंटी सारखा रनरेट नको !
अल निनो आणि क्लायमेट चेंजची,
उठता बसता दाहक भेट नको !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8286
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
25जून2023
 

मर्यादा भंग...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

मर्यादा भंग

घसरत्या टीकेच्या पातळीला,
आता तर नवा धोका आहे.
राजकीय टीका सोडून,
आता कौटुंबिक टीका आहे.

राजकीय टीकेच्या पातळीचा,
हा तर चक्क मर्यादा भंग आहे.
त्यांच्या कौटुंबिक टीकेमुळे,
कौटुंबिक वातावरण तंग आहे.

एकमेकांचा भोंगा वाजवणार,
लोकांचेही लक्ष भोंग्यावर आहे!
राजकारण चुलीपर्यंत गेल्याने,
वड्याचे तेल असे वांग्यावर आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
चिमटा-6845
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
25जून2023
 

Saturday, June 24, 2023

दैनिक वात्रटिका24जून2023वर्ष तिसरेअंक -20वा


दैनिक वात्रटिका
24जून2023
वर्ष तिसरे
अंक -20वा
अंक डाऊनलोड लिंक-…

मोदी मॅजिक...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

मोदी मॅजिक

देशाच्या राजकीय इतिहासातली,
अगदी अभूतपूर्व घटना आहे.
घटनेचे घटनास्थळ म्हणजे,
मुक्काम पोस्ट पाटणा आहे.

भाजपा मुक्त भारत,
हे या घटनेचे लॉजिक आहे.
भाजपावाले म्हणू शकतात,
हे तर मोदी मॅजिक आहे.

विविधतेमध्ये पक्षीय एकता,
हेच महाआघाडीचे सार आहे !
सगळी शस्त्रे जुनी असली तरी,
त्याला एकजुटीची धार आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-8285
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
24जून2023
 

सुसंगतीतील विसंगती...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

सुसंगतीतील विसंगती

कालचे मतभेद आणि मनभेद,
कधी कधी अचानक फेक होतात.
विरोधाला विरोध करणारेही,
कधी कधी सत्तेसाठी एक होतात.

शत्रूचा शत्रू तो आपला दोस्त,
ओठी फिल्मी डायलॉग असतो.
आत दडलेला असतो स्वार्थ,
वरकरणी राजकीय त्याग असतो.

सुसंगतीतही विसंगती दिसते,
नको त्याच्या मांडीला मांडी असते !
आपल्याच चेंडूवरती जी उडते,
ती आपलीच मधली दांडी असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------
चिमटा-6844
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
24जून2023
 

Friday, June 23, 2023

दैनिक वात्रटिका23जून2023वर्ष तिसरेअंक -19 वा



दैनिक वात्रटिका
23जून2023
वर्ष तिसरे
अंक -19 वा
अंक डाऊनलोड लिंक-

गुत्तेदारी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
गुत्तेदारी
पक्ष वाढविण्याचे काम,
गुत्तेदारांकडे गुत्ते असते.
गुत्तेदारीच्या मार्गाने,
सगळेच काम फत्ते असते
गुत्तेदार सोसले जातात,
गुत्तेदार पोसले जातात.
पक्ष कुठलाही असला तरी,
गुत्तेदारच दिसले जातात.
जणू राजकीय पक्षांकडे,
लोकशाहीचे गुत्ते आहे !
लोकशाहीच्या माध्यमातून,
गुत्तेदारी मातते आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------
फेरफटका-8284
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
23जून2023

 

राजेहो...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


 आजची वात्रटिका
-------------------------

राजेहो...

लोकशाहीतही राजेशाहीची,
मस्ती काही अजून गेलेली नाही.
लोकांना अपेक्षित असलेली,
लोकशाही अजून आलेली नाही.

लोकशाहीतही राजेशाहीपुढे,
पुन्हा पुन्हा गोंडा घोळला जातो.
राजेशाहीकडूनही लोकशाहीचा,
वाट्टेल तसा खेळ खेळला जातो.

लोकशाहीकडून राजेशाहीचे,
सहेतूक उदात्तीकरण केले जाते !
खालसा झालेल्या संस्थानिकांचे,
नव्याने पुनरुज्जीवन केले जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------
चिमटा-6843
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
23जून2023

Thursday, June 22, 2023

दैनिक वात्रटिका22जून2023वर्ष तिसरेअंक -18वा


दैनिक वात्रटिका
22जून2023
वर्ष तिसरे
अंक -18वा
अंक डाऊनलोड लिंक-

छोडो कल की बाते...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

छोडो कल की बाते...

जशा ढगात गोळ्या आहेत,
तशा डोक्यातही गोळ्या आहेत.
कधी काळच्या ताज्या बातम्या,
आजच्यासाठी शिळ्या आहेत.

कुणी म्हणतो,हा प्रकार तर,
तब्बल एक वर्ष जुना आहे.
कुणी म्हणतो,आत्महत्येचा विचार;
आपल्या देशामध्ये गुन्हा आहे.

मागणी वरती मागणी येतेय,
नेमकी कुणावर केस करावी?
काय खरे आहे?काय खोटे आहे?
आपण सत्याचीच आस धरावी!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
चिमटा-6842
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
22जून2023
 

Wednesday, June 21, 2023

दैनिक वात्रटिका 21जून2023 वर्ष तिसरे अंक -17वा

दैनिक वात्रटिका
21जून2023
वर्ष तिसरे
अंक -17वा
अंक डाऊनलोड लिंक-
https://drive.google.com/file/d/1tP3lYA5Tj-8A9IuSw8VezIk_WrXWcoW9/view?usp=drivesdk
 

बंडासन आणि गद्दारासन.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

बंडासन आणि गद्दारासन

कुणाचा श्वास कोंडला काय?
कुणी नि:श्वास सोडला काय?
याचा कोणताही फरक,
राजकारणाला पडला काय?

योगायोगाने असा कुणी नाही,
ज्याला हे सत्य ठावे नाही.
बंडासन आणि गद्दारासन,
यातले कुठलेच आसन नवे नाही.

बंडासन आणि गद्दारासन,
यांनाच पणाला लावले जाते
आपले राजकीय आरोग्य,
त्यामुळेच निरोगी ठेवले जाते !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------
फेरफटका-8283
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
21जून2023
 

सर्वेक्षण निष्कर्ष....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

सर्वेक्षण निष्कर्ष

आपापल्या सोयीचे सर्वेक्षण,
आपापल्या सोयीचे आकडे असतात
जसे इतरांची ती थोबाडे,
पण आपले मात्र मुखडे असतात.

सोयीच्या सर्वेक्षण आकडेवारीची,
अगदी सोयीस्कर फिरवणूक असते.
टीचभर सर्वेक्षण;हातभर निष्कर्ष,
आपल्या स्वतःची मिरवणूक असते.

जनता,विरोधक आणि मित्रांसोबत,
सर्वेक्षणाची राजकीय चाल असते!
आपल्याच निवडणूक सर्वेक्षणातून,
आपल्या स्वतःचीच लाल असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------
चिमटा-6841
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
21जून2023
 

Tuesday, June 20, 2023

दैनिक वात्रटिका 20जून2023 वर्ष तिसरे अंक -16वा...

दैनिक वात्रटिका
20जून2023
वर्ष तिसरे
अंक -16वा
अंक डाऊनलोड लिंक-
https://drive.google.com/file/d/1sVBgSDN2pGv12lDWP3YQBs3tZh1Wka8A/view?usp=drivesdk
 

दांभिकतेचा धर्म....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

दांभिकतेचा धर्म

जे जे काही टाकाऊ आहे,
ते ते सारे आज विकाऊ आहे.
सगळेच जुने सोने असते,
हे वचनसुद्धा दिखाऊ आहे .

टाकाऊच्या उदात्तीकरणावरच,
श्रद्धेचा बाजार उभा आहे.
फसवा आणि फसवून घ्या,
एवढी प्रत्येकाला मुभा आहे.

कळूनही वळू दिले जात नाही,
वळले तर पळू दिले जात नाही !
दांभिकतेला दांभिकते पासून,
चुकूनही ढळू दिले जात नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------
फेरफटका-8282
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
20जून2023
 

गद्दारनामा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

गद्दारनामा

हे सगळेच गद्दार आहेत,
तिकडूनही आवाज येतो आहे.
ते सगळेच गद्दार आहेत,
इकडूनही आवाज येतो आहे.

एकमेकांच्या गद्दारीचा,
उघड उघड गद्दारनानामा आहे.
सगळे गद्दारीचे पाप,
एकमेकांच्या नावे जमा आहे.

गद्दार...गद्दार...म्हणीत,
एकमेकांचे जाहीर उद्धार आहेत!
गद्दारांचे गद्दारांना प्रमाणपत्र,
आमच्यातले सगळे खुद्दार आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------
चिमटा-6840
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
20जून2023
 

Monday, June 19, 2023

दैनिक वात्रटिका 19जून2023 वर्ष तिसरे अंक -15वा

दैनिक वात्रटिका
19जून2023
वर्ष तिसरे
अंक -15वा
अंक डाऊनलोड लिंक-
https://drive.google.com/file/d/1rjGd0_JhVq9Dwxp9Ah9DmlI6SquSHYmJ/view?usp=drivesdk
 

पार्टी पार्टी आणि पार्टी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

पार्टी पार्टी आणि पार्टी

कुणी पार्ट्या झोडू लागले,
कुणी पार्ट्या सोडू लागले.
कुणी गरजवंत दिसला की,
त्याला पार्टीत ओढू लागले.

या पार्टीतून त्या पार्टीत,
त्या पार्टीतून या पार्टीत येतात.
कधी एकदा कधी दोनदा,
जिथून येतात,तिथेच जातात.

कधी पार्टीत पार्टीशन असते,
कधी पार्टीचे पार्टिशन होते !
पार्टीचे पार्टीशन झाले की,
मग पार्टीशनला गंमत येते!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------
फेरफटका-8281
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
19जून2023
 

वाद संवाद....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

वाद संवाद

मानवाचे दैवतीकरण चालते,
देव देवतांचे मानवीकरण नाही.
भक्त कुणाचाही असला तरी,
तो सामान्यीकरणास शरण नाही.

कुणी असे काही केले तर,
भक्त मंडळी पेटून उठू लागते.
देव देवतांचे मानवीकरण,
बिचाऱ्या भक्ताला कटू लागते.

काळ पुढे पुढे चालला तरी,
भक्तांना पुराणात रमायला आवडते !
त्यामुळे त्यांची दमछाकक झाली तरी
भक्तांना श्रद्धेपोटी दमायला आवडते!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------
चिमटा-6839
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
19जून2023
 

Sunday, June 18, 2023

राजकीय स्वभाव...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

राजकीय स्वभाव

कधी विरोधात बसले काय?
कधी ते सत्तेत असले काय?
राजकारणी राजकारणीच,
कधी वेगळे दिसले काय?

वेगळे कधी दिसले नाहीत,
वेगळे कधी दिसणार नाहीत.
काही बदल जाणवला तर,
ते राजकारणीच असणार नाही.

स्वभाव कुणाचाही असो,
स्वभावाचा एक नियम असतो!
सुंभ कितीही जळाला तरी,
त्याचा पिळ मात्र कायम असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8280
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
18जून2023
 

पाणीबाणी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


 
आजची वात्रटिका
-------------------------

पाणीबाणी

कुठे पाणी नाही,कुठे नळ नाही,
जिथे नळ आहे तिथे दाब नाही.
पाणी म्हणजे गटारगंगा,
ही काही विशेष अशी बाब नाही.

कुणाच्या आवडीनुसार पाणी येते,
कुणाच्या सवडीनुसार पाणी येते.
कुणासाठी पाणी वाहती गंगा,
कुणाच्या निवडीनुसार पाणी येते.

कुठे पाणी अस्वच्छ,कुठे स्वच्छ,
जिथे स्वच्छआहे,तिथे शुद्धता नाही !
पाणी कुठे मुरतेय ?ते विचारायला,
लोकांची अजूनही सिद्धता नाही!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------
चिमटा-6838
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
18जून2023

Saturday, June 17, 2023

दैनिक वात्रटिका 17जून2023 वर्ष तिसरे अंक -13वा

दैनिक वात्रटिका
17जून2023
वर्ष तिसरे
अंक -13वा
अंक डाऊनलोड लिंक-
https://drive.google.com/file/d/1p7PL2ZGh4AT8SgSw90CJPjU4qhKlhZDm/view?usp=drivesdk
 

राजकीय बेरकीपणा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


 आजची वात्रटिका
-------------------------

राजकीय बेरकीपणा

फक्त राजकारणी लोकच,
राजकारण खेळतात असे नाही.
फक्त राजकारणी लोकच,
कुठेही गोंडा घोळतात असे नाही.

आपल्या अवती भोवतीची,
गैरराजकारणी मंडळी हेच करतात.
आपला गैरसमज वाढत जातो,
राजकारणीच हे डावपेच करतात.

जसे मस्तवाल जनावरांपेक्षा,
गरीब जनावरेही मारकी असतात !
तसे आपल्या सभोवताला/ची माणसे,
राजकारण्यांपेक्षाही बेरकी असतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8279
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
17जून2023

गुपित एका जाहिरातीचे....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

गुपित एका जाहिरातीचे

तो हितचिंतक जाहिरातदार कोण?
हे कोडे काही अजूनही सुटलेले नाही.
सगळे मूग गिळून गप्प आहेत,
अजून कशालाच तोंड फुटलेले नाही.

कुणी अज्ञाताने जाहिरात द्यायला,
ते काही दानपेटीतले गुप्त दान नाही.
बिल कुणाच्या नावावर फाटणार?
कसे मानावे याचेही काही ज्ञान नाही?

ज्यांना जाहिरातींचे पैसे मिळणार,
त्यांच्याकडे आपले लक्ष जाते काय ?
इतरांच्या बेडरूमामध्येही घुसणारे,
खास सूत्रं यावेळी झोपले होते काय?

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------
चिमटा-6837
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
17जून2023
 

Friday, June 16, 2023

दैनिक वात्रटिका16जून2023वर्ष तिसरेअंक -12वा

दैनिक वात्रटिका
16जून2023
वर्ष तिसरे
अंक -12वा
अंक डाऊनलोड लिंक-

गहिराती आयडॉल...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

गहिराती आयडॉल

क्रिकेट आणि सिनेमातले हिरो,
गुटखा खायला सांगू लागले.
नव्या पिढीचे तकलादू आयडॉल,
नको त्या जाहिरातीत रंगू लागले.

सगळ्या धंदेवाईक आयडॉलच्या,
अगदी धंदेवाईक जाहिराती आहेत.
त्यांना आयडॉल मानणारांना सांगा,
तुमचे आयडॉलच गहिराती आहेत.

गहिराती आयडॉलच्या तालावरती,
आपल्या नव्या पिढ्या नाचत आहेत !
लोक त्यांचे अंधानुकरण करतात,
म्हणूनच त्यांनाही धंदे सुचत आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6836
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
16जून2023
 

Thursday, June 15, 2023

दैनिक वात्रटिका 15जून2023 वर्ष तिसरे अंक -11वा....

दैनिक वात्रटिका
15जून2023
वर्ष तिसरे
अंक -11वा
अंक डाऊनलोड लिंक-
https://drive.google.com/file/d/1nR8H7JzCCPywm8Yjhs5EcV2VcuTN9yEX/view?usp=drivesdk
 

अवस्था ते व्यवस्था...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
-------------------------

अवस्था ते व्यवस्था

आज भ्रष्ट लोकांच्या हातूनच
सज्जननांचे सत्कार होत आहेत.
मग भ्रष्ट लोकांच्या तोंडून,
सज्जनतेचे फुत्कार होत आहेत

आजच्या वाढत्या भ्रष्टतेची,
हीच तर खरी गमाडी गंमत आहे.
भ्रष्टांच्या हातून सत्कार नाकारण्याची,
सज्जनांमध्ये कुठे हिम्मत आहे?

तोंड दाबून बुक्क्यांचा मार,
अशी आज सज्जनांची अवस्था आहे!
इच्छा असून नाकारता येत नाही,
तिचेच नाव आजची व्यवस्था आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-8278
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
15जून2023

मानदुखी ते कानदुखी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

मानदुखी ते कानदुखी

कानामागून आले तिखट झाले,
म्हणूनच तर ही कानदुखी आहे.
वरवर कानदुखी असली तरी,
वास्तवात मात्र ही मानदुखी आहे.

प्रत्येकाची आपली प्रतिष्ठा आहे,
प्रत्येकाचाच आपापला मान आहे.
या मान दुखीचे खरे कारण,
एका जाहिरातीचे अख्खे पान आहे.

मानदुखीची ना कानदुखीची,
अज्ञात हितचिंतकाला चिंता आहे !
त्याच्याच 'ॲड' व्हान्सपणामुळे,
लोकप्रियतेचा नवीनच गुंता आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------
चिमटा-6835
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
15जून2023
 

Wednesday, June 14, 2023

दैनिक वात्रटिका14जून2023वर्ष तिसरेअंक -10वा

दैनिक वात्रटिका
14जून2023
वर्ष तिसरे
अंक -10वा
अंक डाऊनलोड लिंक-
https://drive.google.com/file/d/1muQ169czImKtYnHXi3WarijLuBFtcfBO/view?usp=drivesdk

एका जाहिरातीचे परिणाम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

एका जाहिरातीचे परिणाम

एका जाहिरातीने जाहीर झाले,
काय बाहेर?काय आत आहे?
विरोधकांनी गौरवोद्गार काढले,
व्वा....व्वा.....काय बात आहे?

देशात नरेंद्र.... राज्यात देवेंद्र,
कालबाह्य हा नारा आहे.
मुख्यमंत्रीपदाच्या पसंतीचा,
सर्वेक्षणाचा खेळ न्यारा आहे.

जाहिरात काही सरकारी नाही,
ही जाहिरात तर खाजगी आहे !
आतमध्ये नाराजगी असली तरी,
मुखकमलावरती ताजगी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------
फेरफटका-8277
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
14जून2023
 

भावी मुख्यमंत्र्यांच्या देशा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

भावी मुख्यमंत्र्यांच्या देशा...

जी गोष्ट पूर्वीही घडत होती,
तीच मोठ्या वेगाने घडू लागली.
भावी मुख्यमंत्र्यांची लोकसंख्या,
महाराष्ट्रात वेगाने वाढू लागली.

कालही घडले; आजही घडतेय,
कदाचित उद्याही हेच घडू शकते.
जेवढी पक्षीय फटाफूट जास्त होईल,
तेवढी ही लोकसंख्या वाढू शकते.

घोडा मैदान सामने आहे,
आपल्याला फक्त पहावे लागेल !
हे भावी मुख्यमंत्र्यांच्या देशा.....
असे महाराष्ट्र गीत लिहावे लागेल !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
चिमटा-6834
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
14जून2023
 

Tuesday, June 13, 2023

दैनिक वात्रटिका 13जून2023 वर्ष तिसरे अंक -9वा

दैनिक वात्रटिका
13जून2023
वर्ष तिसरे
अंक -9वा
अंक डाऊनलोड लिंक-
https://drive.google.com/file/d/1l3QzN-_3hJ9zHWF_A2dXqwFPkZB2JUH5/view?usp=drivesdk
 

राजकारणाची अपरिहार्यता...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

राजकारणाची अपरिहार्यता

सत्ताधाऱ्यांची आणि विरोधकांची,
प्रत्येकाची एक वेगळी नजर असते.
विषय कुठलाही असला तरी,
तिथे राजकारण नक्की हजर असते.

कालच्या आपल्या भूमिकेवरून,
आज त्यांनाच परत फिरावे लागते !
राजकारण म्हणजे त्यांचा श्वास,
जगण्यासाठी तर ते करावे लागते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-8276
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
13जून2023
 

यशापयश...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

यशापयश

अपयश नेहमीच अनाथ असते,
यशाला मात्र अनेक बाप असतात.
अपयश आरोपीच्या पिंजऱ्यात,
यशाला अनेक गुन्हे माफ असतात.

अपयशाला नसतो पाठीराखा,
यशाची मात्र पाठराखण असते.
अपयशाचा होतो तिरस्कार,
यशाकडे कौतुकाचे टोकन असते.

यशाचा सर्वांनाच हेवा असतो,
यशाच्या श्रेयावरती दावा असतो!
यश सर्वांनाच हुरळून टाकते,
अपयश हा वैयक्तिक ठेवा असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6833
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
13जून2023
 

दैनिक वात्रटिका18एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -316वा

दैनिक वात्रटिका 18एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -316वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1H7R0AkBWdW9aUDYPkGh5Z...