Thursday, June 15, 2023

मानदुखी ते कानदुखी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

मानदुखी ते कानदुखी

कानामागून आले तिखट झाले,
म्हणूनच तर ही कानदुखी आहे.
वरवर कानदुखी असली तरी,
वास्तवात मात्र ही मानदुखी आहे.

प्रत्येकाची आपली प्रतिष्ठा आहे,
प्रत्येकाचाच आपापला मान आहे.
या मान दुखीचे खरे कारण,
एका जाहिरातीचे अख्खे पान आहे.

मानदुखीची ना कानदुखीची,
अज्ञात हितचिंतकाला चिंता आहे !
त्याच्याच 'ॲड' व्हान्सपणामुळे,
लोकप्रियतेचा नवीनच गुंता आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------
चिमटा-6835
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
15जून2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...