Monday, June 5, 2023

शाळेचा वेध...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------
शाळेचा वेध
वेधशाळेचा वेध हा,
विनोदाचा विषय होतो
आकाश निरभ्र सांगितले की,
हमखास पाऊस येतो.
कळत नाही वेधशाळा,
ज्योतिषासारख्या का वागतात?
पावसाची शक्यता नाही सांगताच,
लोक छत्र्या घेऊन निघतात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-543
दैनिक झुंजार नेता
15जून2001

 

No comments:

नेत्यांचे मित्र प्रेम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- नेत्यांचे मित्र प्रेम राजकीय नेत्यांच्या मित्रांवरती, लोक उगीचच दात खात असतात. ते पुंडलिका वर दे...चा गजर...