Tuesday, June 27, 2023

बालविवाह थाट..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

बालविवाह थाट

थोरामोठ्यांच्या लग्नासारखा,
बालविवाहांचा थाटमाट आहे.
टिळा-कुंकू आणि साखरपुडा,
ही बालविवाहांची पळवाट आहे.

कायद्यासोबत वाटा पळवाटा,
जाहीर लपाछपी खेळत आहेत!
कायद्याला बोटावर खेळविणारे,
देवळा देवळात मिळत आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8287
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
27जून2023
 

No comments:

उपद्रव मूल्य...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- उपद्रव मूल्य उपयोगीता मूल्य दाखविता येत नाही, तेच उपद्रव मूल्य दाखवायला लागले. आपल्या उपद्रव मूल्य...