Saturday, June 3, 2023

थुकटपणा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

थुकटपणा

आधी फक्त पिपाण्याचे फुंकायचे,
फुंकता फुंकता भुंकायला लागले.
फुंकणे आणि भुंकणे सहन होताच,
आता तर चक्क थुंकायला लागले.

दाताखाली जीभ चावली तरी,
कुणाच्या नावाने थुंकणे बरे नाही.
आपलीच पिंक;आपलीच पिंकदानी,
तरी किळसवाणे पिंकणे बरे नाही.

आम्ही काही कुणालाच कधी,
वेगवेगळ्या मापाने तोलत नाही !
कितीही तोंडदेखलेपणा केला तरी,
कॅमेरा मुळीच झूठ बोलत नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
चिमटा-6823
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
3जून2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 31मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 301वा l पाने -54

दैनिक वात्रटिका l 31मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 301वा l पाने -54 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1S4SAD0tMR_eqzmeUqaS...