Friday, June 9, 2023

कसाब करणी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

 

आजची वात्रटिका
-------------------------

कसाब करणी

धार्मिक दंगली पाठोपाठ,
राजकीय दंगली घडू लागतात.
आरोप प्रत्यारोपांच्या फैरी,
मोठ्या जोरात झडू लागतात.

दंगलीचा फायदा उठवायला,
सगळेच उतावळे होवू लागतात,
कुणी कुणी होतात गिधाडे,
कुणी डोमकावळे होवू लागतात.

राजकीय नेत्यांचे हे पक्षांतर,
आगामी दंगलीची पेरणी असते !
आपल्या राजकीय फायद्यासाठी,
नेत्यांची कसाब करणी असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
चिमटा-6829
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
9जून2023

No comments:

नेत्यांचे मित्र प्रेम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- नेत्यांचे मित्र प्रेम राजकीय नेत्यांच्या मित्रांवरती, लोक उगीचच दात खात असतात. ते पुंडलिका वर दे...चा गजर...