Friday, June 2, 2023

समृद्धी महामार्ग...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

समृद्धी महामार्ग

समृद्धी महामार्गावरती,
अपघातांची वृद्धी आहे.
दुर्दैवाने म्हणावे लागते,
अपघातांची समृद्धी आहे.

वेग म्हणजे झिंग असते,
वेग म्हणजे नशा आहे.
अपेक्षा केली समृद्धीची,
वास्तवात मात्र दशा आहे.

अपघात हा अपघात असतो,
पण तो टाळता येऊ शकतो!
मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक,
हा इशारा पाळता येऊ शकतो!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8269
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
2जून2023
 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...