Saturday, June 17, 2023

गुपित एका जाहिरातीचे....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

गुपित एका जाहिरातीचे

तो हितचिंतक जाहिरातदार कोण?
हे कोडे काही अजूनही सुटलेले नाही.
सगळे मूग गिळून गप्प आहेत,
अजून कशालाच तोंड फुटलेले नाही.

कुणी अज्ञाताने जाहिरात द्यायला,
ते काही दानपेटीतले गुप्त दान नाही.
बिल कुणाच्या नावावर फाटणार?
कसे मानावे याचेही काही ज्ञान नाही?

ज्यांना जाहिरातींचे पैसे मिळणार,
त्यांच्याकडे आपले लक्ष जाते काय ?
इतरांच्या बेडरूमामध्येही घुसणारे,
खास सूत्रं यावेळी झोपले होते काय?

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------
चिमटा-6837
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
17जून2023
 

No comments:

नेत्यांचे मित्र प्रेम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- नेत्यांचे मित्र प्रेम राजकीय नेत्यांच्या मित्रांवरती, लोक उगीचच दात खात असतात. ते पुंडलिका वर दे...चा गजर...