आजची वात्रटिका
-------------------------
भ्रष्टाचाराची सार्वत्रिकता
जसा तो जळी आहे;स्थळी आहे,
तसा तो काष्ठी आणि पाषाणी आहे.
भ्रष्टाचाराची सार्वत्रिकता हीच,
भ्रष्टाचाराची खरी निशाणी आहे.
जगात अशी एकही गोष्ट नाही,
जिथे भ्रष्टाचार करता येत नाही.
भ्रष्टाचाऱ्याला भ्रष्टाचाऱ्याचा,
कधीच हात धरता येत नाही.
भ्रष्टाचाराची सार्वत्रिकता,
हा काही मुळीच नवा शोध नाही !
स्त्री - पुरुष असला काही,
भ्रष्टाचाऱ्यांमध्ये लिंगभेद नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-8272
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
7जून2023
Subscribe to:
Post Comments (Atom)
खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका
आजची वात्रटिका -------------------- खोके आणि धोके खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे. खोक्या आणि धोक्याच...
-
आजची वात्रटिका ------------------------- सुज्ञास सांगणे न लगे... वाट्टेल त्याला;वाट्टेल तसे, गुळाचे गणपती पावायला लागले. उरले सुरले भक्तही म...

No comments:
Post a Comment