Thursday, June 1, 2023

संपर्काची दावेदारी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

संपर्काची दावेदारी

अमुक संपर्कात;तमुक संपर्कात,
संपर्कात असल्याचे दावे आहेत.
खरे काय आहे?खोटे काय आहे?
बदलते चेहरे,बदलणारी नावे आहेत.

कुणी संपर्क क्षेत्रात आहेत,
कुणी संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत.
संपर्कात असल्याच्या दाव्यावरून,
एकमेकांना जाहीर आहेर आहेत.

आपली रेंज आणि आपले दावे,
मोजून मापून पाहिले पाहिजेत!
नेहमी इतरांच्या संपर्कात असलेले,
जनतेच्या संपर्कात राहिले पाहिजेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
चिमटा-6821
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
1जून2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...