Monday, June 5, 2023

पावसाची नामांतरं....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

पावसाची नामांतरं

कधी रिपरिप तर कधी रिमझिम,
कधी कुसळ,कधी मुसळधार वाटतो.
वादळाला सोबत घेऊन आला की,
तो गारपिट्या आणि धुवांधार वाटतो.

वेळेपूर्वी आला की मान्सूनपूर्व,
वेळेत आला की मोसमी म्हटले जाते.
त्याला वाट्टेल तेव्हा तो आला की,
त्यालाच मग बेमोसमी म्हटले जाते.

कधी कधी आधीमधी आला की,
अवकाळ गाभडे असे हिणवले जाते !
पावसालाही आपल्या लहरीप्रमाणे,
आपल्या शब्दांचे गुलाम बनवले जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
चिमटा-6825
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
5जून2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका19एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -317वा

दैनिक वात्रटिका 19एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -317वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1Hd6EtBLdFyAAoFz3kRowp...