Friday, June 9, 2023

राजकीय भूक...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

राजकीय भूक

कधी उघड;कधी आडून,
राजकारण घुसवले जाते.
मुद्दा कितीही चांगला असो,
त्याचे बुड बसवले जाते.

एकदा राजकारण घुसले की,
सगळी वाट लागली जाते !
आपला फायदा झाला की
राजकीय भूक भागली जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------
दैनिक वात्रटिका
9जून2023
 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...