Thursday, June 1, 2023
महापुरुष विरुद्ध महापुरुष...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका
-------------------------
महापुरुष विरुद्ध महापुरुष
ज्यांचे राजकारण झाले नाही,
असे महापुरुष भेटले नाहीत.
कोणतेच महापुरुष,
राजकारणातून सुटले नाहीत.
काही महापुरुष यांनी,
काही त्यांनी वाटून घेतले आहेत.
जेवढे घेता येतील तेवढे फायदे,
ज्यांनी त्यांनी लाटून घेतले आहेत.
महापुरुष विरुद्ध महापुरुष,
असे आज राजकीय लढे आहेत !
महापुरुषांच्या प्रतिमांना,
रोजच नव्याने मोठाले तडे आहेत!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8268
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
1जून2023
Subscribe to:
Post Comments (Atom)
दैनिक वात्रटिका l 31मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 301वा l पाने -54
दैनिक वात्रटिका l 31मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 301वा l पाने -54 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1S4SAD0tMR_eqzmeUqaS...

-
आजची वात्रटिका ---------------------- गेट-टुगेदर भूतकाळातले मित्र -मैत्रिणी, खूप वर्षानंतर भेटू लागले. उजळून येतात आठवणी, छोटे झाल्यासारखे व...
No comments:
Post a Comment