Tuesday, June 6, 2023

पूल....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

पूल

उद्घाटनाच्या अगोदरच,
काही पूल उड्डाण घेऊ लागले.
पाणी कुठे मुरतेय ते बघायला,
काही पूल नदीत जाऊ लागले.

जिथे जमेल तिथे भ्रष्टाचारी,
भ्रष्टाचाराचे पूल जोडू लागले.
नदीत मुरलेले पाणीच,
पूलाला आपल्याकडे ओढू लागले.

केवळ पूलच नाही तर,
पैसेही पाण्यात जायला लागले !
भ्रष्टाचारी होतात नामानिराळे,
पूलांचे विसर्जन व्हायला लागले !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------
फेरफटका-8271
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
6जून2023
 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...