Friday, June 16, 2023

गहिराती आयडॉल...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

गहिराती आयडॉल

क्रिकेट आणि सिनेमातले हिरो,
गुटखा खायला सांगू लागले.
नव्या पिढीचे तकलादू आयडॉल,
नको त्या जाहिरातीत रंगू लागले.

सगळ्या धंदेवाईक आयडॉलच्या,
अगदी धंदेवाईक जाहिराती आहेत.
त्यांना आयडॉल मानणारांना सांगा,
तुमचे आयडॉलच गहिराती आहेत.

गहिराती आयडॉलच्या तालावरती,
आपल्या नव्या पिढ्या नाचत आहेत !
लोक त्यांचे अंधानुकरण करतात,
म्हणूनच त्यांनाही धंदे सुचत आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6836
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
16जून2023
 

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...