Sunday, June 4, 2023

डबल धमाका...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

डबल धमाका

उत्सवांवर राजकारणाचा,
रंग नेहमीच ओतला जातो.
तिथी आणि तारखेचा,
नेहमीच घोळ घातला जातो.

नेहमीच तारखेमध्ये तिथीचे,
हळूच पिल्लू सोडले जाते.
एकदा रान मोकळे भेटले की,
जोरात पिल्लू उडले जाते.

समर्थक आणि विरोधक,
एकमेकांना भिडवला जातो !
खेळ रंगात आला की,
डबल धमाका उडवला जातो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------
चिमटा-6824
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
4जून2023
 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...