Tuesday, June 6, 2023

जात्यांधता...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

जात्यांधता

डोळे मिटलेल्या बोक्यांच्या तर,
ही गोष्ट लक्षात येणारही नाही.
पुरोगामी महाराष्ट्राला जात सांगते,
मी गेले नाही आणि जाणारही नाही.

काही बोक्यांनी डोळे मिटलेत,
काहींच्या डोळ्यावरती पडदे आहेत.
इथे जसे माणुसकीचे मुडदे आहेत,
तसे ते पुरोगामीत्वाचेही मुडदे आहेत.

अमुक माजलेत;तमुक माजलेत,
असे म्हणत जातीयता माजते आहे !
जातीयतेच्या शूद्र मानसिकतमुळे,
जातच जातीला पाणी पाजते आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6826
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
6जून2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 31मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 301वा l पाने -54

दैनिक वात्रटिका l 31मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 301वा l पाने -54 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1S4SAD0tMR_eqzmeUqaS...