Tuesday, October 31, 2023

दैनिक वात्रटिका31ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..अंक -148 वा


दैनिक वात्रटिका
31ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..
अंक -148 वा 
अंक डाऊनलोड लिंक -

 

विकृत हास्य...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

विकृत हास्य

जस जसे कळू लागते,
तस तसे जास्तच छळू लागते.
जेंव्हा कधी ओल्यासोबत,
थेट वाळलेलेही जळू लागते.

ओले काय?वाळले काय?
सगळ्यांचीच धग बसू लागते !
सत्याकडे बघून असत्य,
मग विकृतपणे हसू लागते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
दैनिकवात्रटिका
वर्ष -3रे
31ऑक्टोबर2023
 

Monday, October 30, 2023

दैनिक वात्रटिका30ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..अंक -147 वा


 दैनिक वात्रटिका
30ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..
अंक -147 वा 
अंक डाऊनलोड लिंक -

लक्ष विचलन...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

लक्ष विचलन

जुन्या मुद्द्याकडून नव्या मुद्द्याकडे,
लोक बरोबर वळवले जातात.
लोकांचे लक्ष विचलित करून,
लोक बरोबर खेळवले जातात.

एकदा नवे मुद्दे चर्चेत आले की,
लोक जुने मुद्दे विसरू लागतात.
नव्या मुद्द्यांच्या लाटेमध्ये,
जुन्या लाटा ओसरू लागतात.

जुन्या मुद्द्यांना नव्या मुद्द्यांनी,
राजकीय शह दिले जातात !
नवे मुद्दे नवे असले तरी,
सोईप्रमाणे ते जुने केले जातात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8391
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
30ऑक्टोबर2023
 

Sunday, October 29, 2023

दैनिक वात्रटिका29ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..अंक -146 वा


 दैनिक वात्रटिका
29ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..
अंक -146 वा 
अंक डाऊनलोड लिंक -

बुद्धी ग्रहण...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

बुद्धी ग्रहण

सूर्यग्रहण असो वा चंद्रग्रहण,
ग्रहणामागे कुणाची तरी छाया आहे.
पण ज्याच्या बुद्धीलाच ग्रहण लागले,
त्याची मात्र मनापासून दया आहे.

सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणपेक्षा,
बुद्धी ग्रहणाचे फल खूप घातक असते !
आपल्यावर आपलीच काळी छाया,
आपले आपल्यालाच सुतक असते!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8390
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
29ऑक्टोबर2023
 

Saturday, October 28, 2023

दैनिक वात्रटिका28ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..अंक -145वा


दैनिक वात्रटिका
28ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..
अंक -145वा 
अंक डाऊनलोड लिंक -

मी पुन्हा येणार...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

मी पुन्हा येणार...

कुणी स्वप्नात,कुणी दिवा स्वप्नात,
रात्रंदिवस रमायला लागले.
मी पुन्हा येणार ...चे सूर
पुन्हा नव्याने घुमायला लागले.

कुणाकुणाच्या पोटात आनंद,
कुणाकुणाच्या पोटात गोळा आहे !
विधानसभेच्या हालचाली म्हणजे,
आगामी लोकसभेवर डोळा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8389
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
28ऑक्टोबर2023
 

Friday, October 27, 2023

दैनिक वात्रटिका27ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..अंक -144 वा


 दैनिक वात्रटिका
27ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..
अंक -144 वा 
अंक डाऊनलोड लिंक -

राजकीय निवृत्ती...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

राजकीय निवृत्ती

जस जशा निवडणुका,
जवळ जवळ यायला लागल्या.
तस तशा राजकीय निवृत्तीच्या,
घोषणा व्हायला लागल्या.

पक्षा सोबत लोकांनाही,
सगळे गृहीत धरीत आहेत.
पुन्हा पुन्हा हलवून.
आपला खुट्टा घट्ट करीत आहेत.

जेवढे ज्याचे उपद्रव मूल्य,
तेवढी त्याची मनधरणी आहे !
राजकीय निवृत्तीच्या घोषणा,
ही निवडणुकीची करणी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8385
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
27ऑक्टोबर2023
 

Thursday, October 26, 2023

दिवाळी अंक 2023 साठी 151 वात्रटिका pdf


दिवाळी अंक 2023 साठी 151 वात्रटिका pdf
पुढील लिंक वर क्लिक करून आपण डाऊनलोड करून घेऊ शकता
-सूर्यकांत डोळसे पाटोदा (बीड)
   मोबा.9923847269


सामाजिक आरोग्य..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

सामाजिक आरोग्य

शपथा खोट्या वाटू लागल्या,
आणा भाका खोट्या वाटू लागल्या.
अविश्वासाच्या शंका कुशंका,
सर्वांच्या मना-मनात दाटू लागल्या.

शंका आणि कुशंकांबरोबरच,
अविश्वासाचे वादळ उठले आहे.
ज्यांच्या त्यांच्या भोववताली,
संशयाचे दाट धुके दाटले आहे.

जो तो आपल्याच तोऱ्यात आहे,
जो तो आपल्याच हेक्यात आहे !
सामाजिक आरोग्य तर,
आज जरा जास्तच धोक्यात आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
दैनिकवात्रटिका
वर्ष -3रे
26ऑक्टोबर2023
 

दैनिक वात्रटिका26ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..अंक -143 वा


 दैनिक वात्रटिका
26ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..
अंक -143 वा 
अंक डाऊनलोड लिंक -

Tuesday, October 24, 2023

दैनिक वात्रटिका24ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..अंक -141 वा

दैनिक वात्रटिका
24ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..
अंक -141 वा 
अंक डाऊनलोड लिंक -

रावण दहन....आठवणीतील वात्रटिका

आठवणीतील
वात्रटिका
-------------------------

रावण दहन
एवढे सारे जाळले तरी
पुन्हा रावण कुठून येतात?
पुढच्या विजयादशमीला
पुन्हा नव्याने त्रास देतात.
देखावा म्हणून आपण सारेच
रावण जाळत असतो !
आपल्या मनात एकेक
सारेच रावण पाळत असतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-2069
दैनिक झुंजार नेता
15ऑक्टोबर 2005
-------------------------------
माझ्या फेरफटका या
सदरातील हजारो वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना
शेअर करण्यासाठी क्लिक करा.
----------------------------------------
Copyright© zunjaraneta epaper
Designed & Developed by: suryakant dolase
🔴
सदरील वात्रटिका मित्रांना आणि इतर group वर आहेत तश्या शेअर करण्यास विना अट संमती आहे.
कृपया पुन्हा विचारणा करू नये

 

daily vatratika...24octo2023


 

संभ्रम ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

संभ्रम

जसे खऱ्याचे खोटे होते,
तसे खोट्याचेही खरे होते.
एकदा राजकारण आले की,
असेच काहीसे सारे होते.

कर्ते करविते नामानिराळे,
इतरांच्या डोक्यांचा भुगा होतो.
काय खरे ? काय खोटे?
डोक्यातला किडा जागा होतो.

एकदा किडे जागे झाले की,
ते वाट्टेल तसे उडू लागतात !
कंड्या आणि अफावांसोबत,
वावड्यासुद्धा उडू लागतात !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8387
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
24ऑक्टोबर2023
 

Monday, October 23, 2023

दैनिक वात्रटिका23ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..अंक -140 वा


दैनिक वात्रटिका
23ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..
अंक -140 वा 
अंक डाऊनलोड लिंक -
 

डबल ढोलकी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
डबल ढोलकी
कुणालाच काही कळेना?
ते अजून तरी कुठे सिद्ध आहे?
कोण कुणाच्या बाजूने,?
कोण कुणाच्या विरुद्ध आहे?
जसे अर्धे बाजूने आहेत,
तसे विरोधातही अर्धे आहेत.
कसला विरोध ?कसली बाजू?
सगळेच अर्धे मुर्धे आहेत.
तशी सगळ्यांचीच देहबोली,
अगदीच बोलकी आहे !
दोन्हीही बाजूंनी वाजणारी,
ही तर डबल ढोलकी आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
दैनिकवात्रटिका
वर्ष -3रे
23ऑक्टोबर2023

Sunday, October 22, 2023

दैनिक वात्रटिका 22ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे.. अंक -139 वा


दैनिक वात्रटिका
22ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..
अंक -139 वा अंक डाऊनलोड लिंक -https://drive.google.com/file/d/1SQ6rPsS59TdCfR4XZo4sxfSpP3MonE99/view?usp=drivesdk
 

रहस्य भेद...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
रहस्य भेद
राजकारणात गुन्हेगार,
जस जसे वाढायला लागले.
तस तसे राजकरण्यांची इज्जत,
गुन्हेगार काढायला लागले.
दोघांचीही इकडे तिकडे,
सतत आवक जावक आहे.
राजकारणी आणि गुन्हेगार,
यांचे तर एकच देवक आहे.
दोघांचेही कुळ आणि मूळ,
कधीच कुणीसुद्धा शोधू नये !
जे सर्वांनाच माहिती आहे,
असे उघड रहस्यही भेदू नये !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
दैनिकवात्रटिका
वर्ष -3रे
22ऑक्टोबर2023

 

Saturday, October 21, 2023

ड्रग्जची नशा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

ड्रग्जची नशा

राजकारणी ते राजकारणीच,
त्यांना राजकारणाचा धोशा आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणाला,
आता तर थेट ड्रग्जची नशा आहे.

पळवा-पळवी;खेळवा-खेळवी,
हे सगळे तर अगदी नित्य आहे.
ड्रग्जची नशा चढली असली तर,
त्यांचे प्रचंड शब्द लालित्य आहे.

राजकारण आणि ड्रग्ज म्हणजे,
चक्क नशेचे कॉकटेल आहे !
जिथे गुन्हेगारांना डांबायचे,
तिथूनच ड्रग्ज रॅकेटचा स्मेल आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
दैनिक वात्रटिका
वर्ष -3रे
21ऑक्टोबर2023
 

दैनिक वात्रटिका21ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..अंक -138वा


दैनिक वात्रटिका
21ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..
अंक -138वा 
अंक डाऊनलोड लिंक -
 

Friday, October 20, 2023

दैनिक वात्रटिका20ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..अंक -137वा अंक


 दैनिक वात्रटिका
20ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..
अंक -137वा 
अंक डाऊनलोड लिंक -

नवा भेद...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

नवा भेद

शाकाहार विरुद्ध मांसाहार,
नव्या भेदाची भरती आहे.
ज्याच्या त्याच्याकडून तर,
स्वतःचीच आरती आहे.

ज्याला जे खायचेय ते खा,
खाण्यावरून असे पेटू नका !
द्वेषाचे कधीच पोट भरत नाही,
कुणीही द्वेषाने पेटून उठू नका !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8387
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
20ऑक्टोबर2023
 

Thursday, October 19, 2023

दैनिक वात्रटिका19ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..अंक -136वा


दैनिक वात्रटिका
19ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..
अंक -136वा 
अंक डाऊनलोड लिंक -

नवरंग आहार.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
नवरंग आहार
नवरात्रीच्या नवरंगांना,
आता नवीनच बहार आहे.
ज्या दिवसाचा जो रंग,
त्याच रंगाचा आहार आहे.
नवरात्रीच्या नवा रंगांची,
ही तर नवीनच धूम आहे.
जसे ल्यावे;तसेच खावे,
ही तर नवीनच टूम आहे.
ही रंगीत संगीत मेजवानी?
की हा डाएट प्लॅन आहे ?
आपल्यासाठी हे हास्यास्पद,
पण भक्तांसाठी छान आहे !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
दैनिक वात्रटिका
वर्ष -3रे
19ऑक्टोबर2023

 

Wednesday, October 18, 2023

दैनिक वात्रटिका18ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..अंक -135वा

दैनिक वात्रटिका
18ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..
अंक -135वा 
अंक डाऊनलोड लिंक -

 

भूकंपाच्या पूर्वसूचना....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

भूकंपाच्या पूर्वसूचना

कोर्ट आणि निवडणूक आयोगाकडे,
जशा याचनावरती याचना आहेत.
तशा महाराष्ट्रातही भूकंपाच्या,
पूर्वसूचनावरती पूर्व सूचना आहेत.

राजकीय भूकंपाच्या पूर्वसूचनेने,
शंका आणि कुशंकांनाही ऊत आहेत.
भूकंपाच्या पूर्वसूचना देणारे,
सगळे पेरलेले राजकीय दूत आहेत.

ज्याच्या त्याच्या डोक्यामध्ये,
चूकचुकणारी शंकेची पाल असेल !
इतरांना भूकंपाचे धक्के असतील,
त्यांच्यासाठी राजकीय चाल असेल !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8385
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
18ऑक्टोबर2023
 

Tuesday, October 17, 2023

दैनिक वात्रटिका17ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..अंक -134वा


 दैनिक वात्रटिका
17ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..
अंक -134वा 
अंक डाऊनलोड लिंक -

ऑलिंपिकमध्ये क्रिकेट..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

ऑलिंपिकमध्ये क्रिकेट

ऑलिंपिकच्या वर्तुळात,
आता क्रिकेटचीही एन्ट्री आहे.
ऑलिंपिकच्या कुंभमेळ्यात,
आता क्रिकेटचीही कॉमेंट्री आहे.

क्रिकेटच्या मार्केटला,
आता नवा बाजार खुला आहे.
क्रिकेटचे विश्व विस्तारले,
ऑलिंपिकने विश्वास दिला आहे.

कोट्यावधीत खेळणाऱ्यांना,
एका मेडलसाठी खेळावे लागेल !
टेस्टला आणि वनडे ला मात्र,
पार धुळीस मिळावे लागेल !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8384
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
17ऑक्टोबर2023
 

Monday, October 16, 2023

दैनिक वात्रटिका16ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..अंक -133वा


दैनिक वात्रटिका
16ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..
अंक -133वा 
अंक डाऊनलोड लिंक -

मुखवट्या मागचा दुखवटा..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

मुखवट्या मागचा दुखवटा

जमेल त्याचे हात धरू लागले,
जमेल त्याचे पाय धरू लागले.
आघाड्यांच्या नावाखाली,
सर्वच पक्ष बघा काय करू लागले?

सगळ्या भाराभर चिंध्या वाटतात,
त्यांच्यामध्ये एक ना धड आहे.
भूमिका बदलणे सोपे आहे,
पण भूमिका निभावणे अवघड आहे.

कुणी बदलत आहे चेहरा,
कुणाच्या चेहऱ्यावर मुखवटा आहे !
वर वर तडजोडीचा आनंद,
आत मध्ये मात्र दुखवटा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8383
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
16ऑक्टोबर2023
 

Sunday, October 15, 2023

दैनिक वात्रटिका 15ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..


दैनिक वात्रटिका
15ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..
अंक -132वा
अंक डाऊनलोड लिंक -https://drive.google.com/file/d/1NwKXcCsYrYqrnF3_ig6RPRVW9H4HyE7u/view?usp=drivesdk
 

रंगवेडी तऱ्हा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

रंगवेडी तऱ्हा

आजचा अमुक रंग आहे,
उद्याचा तमुक रंग आहे.
सगळ्याच रंगबावऱ्यांना,
रोज नव्या रंगाची झिंग आहे.

एक एक रंग वेडी,
एवढी काही रंग वेडी आहे.
सकाळ,दुपार,संध्याकाळ,
वेगळ्या छटांची साडी आहे.

एकच रंग पण छटा अनेक,
अशी त्यांची रंगवेडी तऱ्हा आहे !
कुणाच्या अकलेचा पंचनामा,
आपण न केलेलाच बरा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8382
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
15ऑक्टोबर2023
 

Saturday, October 14, 2023

दैनिक वात्रटिका14ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..अंक -131वा


दैनिक वात्रटिका
14ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..
अंक -131वा 
अंक डाऊनलोड लिंक -
 

मानसिक सौंदर्य...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

मानसिक सौंदर्य

जसे आपण शरीराला जपतो,
तसे मनालाही जपले पाहिजे.
जेवढे शरीरा सुंदर ठेवतो,
तेवढेच सुंदर मन आपले पाहिजे.

आपल्या व्यक्तिमत्त्वाचे आरसे,
म्हणजे शरीर आणि मन आहेत.
आपण वेगवेगळे मानले तरी,
सांगा तसेही ते कुठे दोन आहेत ?

शरीर सुंदर म्हणजे मन सुंदर,
याची सांगा कुठे शक्यता असते?
मात्र सुंदर मन आणि सुंदर जग,
याच्यात मात्र एक वाक्यता असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8381
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
14ऑक्टोबर2023
 

Friday, October 13, 2023

दैनिक वात्रटिका13ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..अंक -130वा

दैनिक वात्रटिका
13ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..
अंक -130वा 
अंक डाऊनलोड लिंक -

 


शल्य...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

शल्य

तुमची जिंकण्याची शक्यता,
जेंव्हा पैकीच्या पैकी असते.
तेंव्हा जिंकून येण्याची क्षमताच,
उमेदवारीची लायकी असते.

तुम्ही निवडून येऊ शकता,
हेच तुमचे पुण्य असते,
निष्ठा, कार्य आणि कर्तृत्व,
बाकी सगळेच शून्य असते.

तुमची जिंकण्याची क्षमता,
हेच तुमचे उपद्रव मूल्य असते !
आकडेबाजीच्या खेळाचे,
हेच सर्वात मोठे शल्य असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8380
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
13ऑक्टोबर2023
 

Thursday, October 12, 2023

दैनिक वात्रटिका12ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..अंक -129वा

दैनिक वात्रटिका
12ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..
अंक -129वा 
अंक डाऊनलोड लिंक -
 


सत्याची गळचेपी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

सत्याची गळचेपी

सत्यापेक्षा असत्याचाच,
आज सगळीकडे डंका आहे.
असत्याचे होते कौतुक,
पण सत्यावरतीच शंका आहे.

असत्याकडे कानाडोळा,
सत्याकडे बोट उठले जाते.
सत्यावर शंका घेतल्याने,
असत्य मोकाट सुटले जाते.

सत्य हे सत्य असले तरी,
सत्य कुणाला पेलवत नाही!
कितीही इच्छा असली तरी,
सर्वांना सत्य बोलवत नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8379
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
12ऑक्टोबर2023
 

Wednesday, October 11, 2023

दैनिक वात्रटिका11ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..अंक -128वा



दैनिक वात्रटिका
11ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..
अंक -128वा 
अंक डाऊनलोड लिंक -

कॉपीचे हायटेक दर्शन....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

कॉपीचे हायटेक दर्शन

वाढत्या बेरोजगारीचा ,
फक्त इशाराच काफी आहे.
कोतवालाच्या परीक्षेतसुद्धा,
आता हायटेक कॉपी आहे .

वाढत्या बेरोजगारीचा इशारा,
समजून घेतलेलाच बरा आहे.
उलटा चोर कोतवाल को डाटे,
अशीच काहीशी तऱ्हा आहे.

बेरोजगारी वाढविते स्पर्धा,
स्पर्धा कॉप्या वाढविते आहे !
लो प्रोफाइल परीक्षेतही,
कॉपी हायटेक दर्शन घडवितेआहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8378
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
11ऑक्टोबर2023
 

Tuesday, October 10, 2023

दैनिक वात्रटिका10ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..अंक -127वा


दैनिक वात्रटिका
10ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..
अंक -127वा 
अंक डाऊनलोड लिंक -
 

सामाजिक अवस्था...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

सामाजिक अवस्था

कुणी मेले काय?कुणी जगले काय?
लोकांनाही कशाचे काही वाटत नाही.
कितीही टाहो ऐकले तरी,
कुणाला हुंदकाही सुद्धा फुटत नाही.

जणू काय आजकाल लोकांची,
सगळी संवेदनशीलता मेली आहे !
रोजचेच मढे त्याला कोण रडे,
यामुळेच ही अवस्था झाली आहे !!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8377
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
10ऑक्टोबर2023
 

दैनिक वात्रटिका27एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -325वा

दैनिक वात्रटिका 27एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -325वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1NoornI--tmMB-ZAcXYuN3...