Showing posts with label उमेदवारीची लायकी. Show all posts
Showing posts with label उमेदवारीची लायकी. Show all posts

Friday, October 13, 2023

शल्य...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

शल्य

तुमची जिंकण्याची शक्यता,
जेंव्हा पैकीच्या पैकी असते.
तेंव्हा जिंकून येण्याची क्षमताच,
उमेदवारीची लायकी असते.

तुम्ही निवडून येऊ शकता,
हेच तुमचे पुण्य असते,
निष्ठा, कार्य आणि कर्तृत्व,
बाकी सगळेच शून्य असते.

तुमची जिंकण्याची क्षमता,
हेच तुमचे उपद्रव मूल्य असते !
आकडेबाजीच्या खेळाचे,
हेच सर्वात मोठे शल्य असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8380
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
13ऑक्टोबर2023
 

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...