Wednesday, September 9, 2026

लाभार्थी टोळ्या....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------------
लाभार्थी टोळ्या
आपल्या समजूती भोळ्या आहेत,
आपल्या समजूती खुळ्या आहेत.
जिकडे बघावे तिकडे,
प्रत्येकाच्या लाभार्थी टोळ्या आहेत.
सगळ्याच लाभार्थी टोळ्यांचा,
अगदी सगळीकडेच वावर आहे.
सर्वच लाभार्थी टोळ्यांकडे,
कसली ना कसली पॉवर आहे.
गरजवंतांना अक्कल नसते,
ज्याला लुटता येईल ते लुटत आहेत !
सगळ्या लाभार्थी टोळ्याच,
आज लोकांना आधार वाटत आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9393
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
9 सप्टेंबर 2026

 

No comments:

लाभार्थी टोळ्या....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------------------ लाभार्थी टोळ्या आपल्या समजूती भोळ्या आहेत, आपल्या समजूती खुळ्या आहेत. जिकडे बघावे तिकडे, प्रत...