आजची वात्रटिका
----------------------------
आपलेच दात,आपलेच ओठ
समाजकारणात राजकारण,
बेमालूमपणे घुसवले जात आहे.
ज्यांच्या खांद्यावर डोके ठेवावे,
त्यांच्याकडूनच फसवले जात आहे.
जसे फसलेले आपलेच आहेत,
तसे फसवणारेही आपलेच आहेत.
परस्परांच्या स्वार्थापोटीच,
सर्वांनी संबंध जपलेच आहेत.
आपलेच दात,आपलेच ओठ,
हेच या सगळ्यांचे सार आहे !
कितीही आर या पार म्हटले तरी,
तोंड दाबून बुक्क्यांचा मार आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9408
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
24 सप्टेंबर 2026

No comments:
Post a Comment