Friday, September 11, 2026

ए.आय.चे पराक्रम ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
ए.आय.चे पराक्रम
जणू कुऱ्हाडीचा दांडा,
गोतास काळ व्हायला लागला.
मानवी अस्तित्वाच्या मुळावरती.
ए.आय. यायला लागला.
जे जे गुपित वाटत होते,
ते ते सगळे फुटायला लागले.
नाव कृत्रिम बुद्धिमत्ता असूनही,
सगळे नैसर्गिक वाटायला लागले.
तरीही सगळे आलबेल असल्याची,
माणसाची उगीचच टीमकी आहे !
फक्त सध्या तरी ए.आय. कडून,
लफडे ओपन करायची धमकी आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9395
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
11 सप्टेंबर 2026

No comments:

ए.आय.चे पराक्रम ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- ए.आय.चे पराक्रम जणू कुऱ्हाडीचा दांडा, गोतास काळ व्हायला लागला. मानवी अस्तित्वाच्या मुळावरती. ए.आ...