Sunday, September 20, 2026

श्रेयवाद....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
श्रेयवाद
जसे कधीकधी श्रेय वाटले जाते,
तसे नेहमीच श्रेय लाटले जाते.
ज्याला ज्याला श्रेय लुटता येईल,
त्याच्याकडून श्रेय लुटले जाते.
श्रेयासाठी वाट्टेल ते म्हणीत,
सर्व श्रेय लाट्यांची चढाई असते.
ठकास महाठक शोभावेत,
अशी श्रेय लाट्यांची बढाई असते.
श्रेय वाटायचे तर वाटू द्या,
श्रेय लाटायचे तर खुशाल लाटू द्या !
पण इतरांचे श्रेय ओरबाडताना,
मनाची नाही तर जनाची तरी वाटू द्या !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9404
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
20सप्टेंबर 2026

 

No comments:

दुष्काळी पाहुणचार ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- दुष्काळी पाहुणचार दुष्काळ पाहणी दौरा बघून, आमचे मतही ठाम झाले. एकाचा पाहुणचार करताना, दुसरेच हकन...