Thursday, June 30, 2022

सत्तांतर आणि नामांतर... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

सत्तांतर आणि नामांतर

पहिले सरकार गेले की,
दुसरे सरकार येते असते
लोकांच्या लेखी फक्त,
सरकारचे नामांतर होत असते.

किती आले?किती गेले?
लोक आहेत तिथेच असतात.
सरकारं बदलली तरी,
मंत्री मात्र आहेत तेच असतात.

कालच्यात आणि आजच्यात,
तसे फारसे कुठे अंतर असते ?
त्यामुळे सत्तांतर झाले तरी,
दुर्दैवाने तेही एक नामांतर असते !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6516
दैनिक पुण्यनगरी
30जून 2022



 

मी जातोय...मी येतोय... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

मी जातोय...मी येतोय...

कुठे दुखवटा साजरा होतोय,
कुठे जल्लोश साजरा होतोय.
पुन्हा तोच ओळखीचा आवाज,
मी येतोय,मी येतोय,मी येतोय.

जाणारे जसे अपघाती आले होते,
तसे ते अपघातीच जात आहेत !
आपल्या अपघाताच्या पाठीमागे,
आपलेच डावे उजवे हात आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7970
दैनिक झुंजार नेता
30जून2022

 

Wednesday, June 29, 2022

मतदार आहे साक्षीला... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

मतदार आहे साक्षीला

कुणाला लोकशाही वाचवायची आहे,
कुणाला लोकशाही नाचवायची आहे.
लोकशाही गिळंकृत करून,
कुणाला लोकशाही रिचवायची आहे.

लोकशाहीच्या बाबतीमध्ये,
प्रत्येकाचा वेग वेगळा पक्ष आहे !
बिचाऱ्या हतबल मतदार राजाची,
या सगळ्या तमाशाला साक्ष आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-7969
दैनिक झुंजार नेता
29जून2022

 

जोकर... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

जोकर

कुणाच्या अवती भोवती,
डोंगर अन् झाडी आहे.
कुणाच्या अवती भोवती,
नोटीस घेवून ईडी आहे.

हा नशिबाचा भाग आहे,
असे कुणा कुणाला वाटेल.
नशिबाचे स्टार बदलेल,
फाईव्ह स्टार हॉटेल.

अचानक काहीच नाही,
सगळे पूर्वलिखित आहे !
हुकूमाचे पत्ते हाती ठेवून,
जो तो जोकर फेकीत आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6515
दैनिक पुण्यनगरी
29जून 2022

 

Tuesday, June 28, 2022

अविश्वास.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

अविश्वास

धनुष्याला बाणाचा,
विश्वास वाटत नाही.
मनालाच मनाचा,
विश्वास वाटत नाही.

दांड्याला झेंड्याचा,
विश्वास वाटत नाही.
बुडख्याला शेंड्याचा,
विश्वास वाटत नाही.

बंडाचा बंडखोरांना,
विश्वास वाटत नाही.
सावांचाही चोरांना,
विश्वास वाटत नाही.

वाघाला डरकाळ्याचा
विश्वास वाटत नाही.
आपल्याच टिरकाळ्याचा,
विश्वास वाटत नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6514
दैनिक पुण्यनगरी
28जून 2022

 

अल्पमत... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

अल्पमत

विश्वासाची अविश्वास,
अशी जेंव्हा गत होते.
तेंव्हा बघता बघता,
बहुमताचे अल्पमत होते.

बहुमत म्हणजे काय?
मोजणी डोक्याची असते.
बहुमताच्या सिद्धतेसाठी,
मोजणी खोक्याची असते.

सवाल जसा मोक्याचा असतो,
तसा सवाल धोक्याचा असतो !
बहुमत आणि अल्पमत,
फरक डोक्या खोक्याचा असतो!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7968
दैनिक झुंजार नेता
28जून2022

 

दैनिक वात्रटिका29मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -296वा

दैनिक वात्रटिका 29मार्च2024....वर्ष- तिसरे.. अंक -296वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/16Y5CPWm1eVe-mvmywM7Inn...