Wednesday, June 8, 2022

पावसाचा खेळ... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------
पावसाचा खेळ
डोक्यावरचे आभाळ जेव्हा,
रिकामे पळून जाते.
शेतकऱ्याचे काळीज तेव्हा,
ढगासारखे विरघळून जाते !
तो स्वप्न पेरतो,
फक्त बी-बियाणे पेरलेले नसते.
पाऊस नशिब घेऊन जातो,
हाती काही उरलेले नसते.
पाऊस मिनरल वॉटर होतो,
पाऊस पाण्याचा टँकर होतो !
निसर्गाच्या खेळाचा
पाऊस दगाबाज अँकर होतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-3743
दैनिक झुंजार नेता
7जून2010 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...