आठवणीतील
वात्रटिका
----------------------
खट्याळ पाऊस
पावसाची तऱ्हाच
खुप भाडमुठी असते.
कधी कोरडेठाक,
कधी ढगफुटी असते.
मुसळधार, कुसळधार
कधी संतत धारा असतात.
कधी कडाडणाऱ्या विजा,
कधी तडाडणाऱ्या गारा असतात.
नक्षत्रांच्या भविष्याला
पाऊस थारा देत नाही !
कुणी अंदाज केले की,
पाऊस कांही येत नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-3805
दैनिक झुंजार नेता
8 ऑगस्ट2010
No comments:
Post a Comment