Friday, June 24, 2022

प्रायोजित बंड ... मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
---------------------

प्रायोजित बंड

कधी बंड नियोजित असते,
कधी बंड आयोजित असते.
सर्वांपेक्षा धोकादायक म्हणजे,
जेव्हा बंड प्रायोजित असते.

बंडासाठी प्रायोजकांकडून,
वाट्टेल ती रसद पुरवली जाते !
प्रायोजित बंडामध्ये नेहमीच,
बंडवाल्यांची जिरवली जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6510
दैनिक पुण्यनगरी
24जून 2022

No comments:

भविष्यवाणी ... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका --------------------- भविष्यवाणी अजूनही या प्रश्नांची उत्तरे, कुणालाच मिळाले नाहीत. जगाचे भविष्य सांगणाऱ्यांना, स्वतःचे मृत्...