Sunday, June 5, 2022

झिंगरू आणि शिंगरू... मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
----------------------

झिंगरू आणि शिंगरू

घोडे बाजार सुरू झाल्याचे,
इशारे कानी आदळू लागतात.
मग झिंगरू आणि शिंगरू,
जोर जोरात उधळू लागतात.

झिंगऱ्या - शिंगऱ्यांच्या हाती,
रेसच्या घोड्यांचे लगाम असतात.
सुरुवातीला करतात फुर फुर,
नंतर सूचक असे पैगाम असतात.

अस्तिक आणि नास्तिकांचाही,
झिंगऱ्या शिंगऱ्याला नवस असतो!
प्रत्येक झिंगऱ्या शिंगऱ्याचा,
राजकारणात एक दिवस असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6496
दैनिक पुण्यनगरी

5जून 2022 

No comments:

दैनिक वात्रटिका l 1फेब्रुवारी 2025वर्ष- चौथेअंक - 244वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 1फेब्रुवारी 2025 वर्ष- चौथे अंक - 244वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1pdEGCxoCqmh185jRv5...