Saturday, June 11, 2022

मौका आणि चौका..आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------
मौका आणि चौका
आपल्याला जी अंदाधुंदी वाटते,
तीच कुणाला सुवर्णसंधी वाटते.
जसे सैराट जनावरांना,
मोकळे रान म्हणजे चंदी वाटते.
एकदा रान मोकळे दिसले की,
सैराट जनावरे चेकाळू लागतात !
मिला मौका,मार चौका,
सगळे सोबत बोकाळू लागतात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6499
दैनिक पुण्यनगरी
11जून 2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...