आजची वात्रटिका
----------------------
अंदाज अपना अपना
एकमेकांच्या शाळाच,
आता वेधशाळा घेऊ लागल्या.
मान्सूनच्या आगमनाचे,
वेगवेगळे अंदाज देऊ लागल्या.
मान्सून कसा सांगेल?
आपण स्वतःच लेट आहोत.
वेधशाळांनी विश्वास द्यावा,
आम्ही 'स्काय - मेट' आहोत.
मान्सूनचा अंदाज चुकू शकतो,
पावसाचाही अंदाज हुकू शकतो!
पण विज्ञान हे विज्ञान असते,
एवढे तरी नव्याने शिकू शकतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6493
दैनिक पुण्यनगरी
2जून 2022
No comments:
Post a Comment