आजची वात्रटिका
----------------------
वटपौर्णिमेनंतर.....
शहरातील अनेक नवरोबांना,
वडाचे झाड धुंडाळताना पाहिले.
बायकोने बांधलेल्या दोर्यांना,
मी उलटे गुंडाळताना पाहिले.
केवढी श्रद्धा आणि विश्वास?
त्यामुळेच ही सारी धडपड होते
जेवढा आश्चर्यचकित मी होतो,
तेवढेच आश्चर्यचकित वड होते.
दोष द्यावा तरी कुणाला?
सारेच परंपरांचे गुलाम आहेत!
तरीही त्या प्रयत्नवादी नवर्यांना,
कोपरापासून सलाम आहेत!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6502
दैनिक पुण्यनगरी
17जून 2022
No comments:
Post a Comment