Tuesday, June 7, 2022

सवयीचे गुलाम.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------

सवयीचे गुलाम

आंधळे, गोंधळे आणि वेंधळे,
या कट्टर भक्तांच्या खुणा आहेत.
वाकलेले त्यांचे कणे,
झुकलेल्या त्यांच्या माना आहेत.

त्यांच्या सर्व खाणा - खुणांना,
त्यांचेच तर सलाम आहेत !
ते काही साधेसुधे नाहीत,
ते तर सवयीचे गुलाम आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-7952
दैनिक झुंजार नेता
7जून2022

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...